रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (14:27 IST)

धक्कादायक ! आपल्या दोन वर्षाच्या मुलीसह पत्नीची गळा चिरून हत्या करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

आपल्या दोन वर्षाच्या चिमुकली सह पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना बीडच्या सिरसाळ्यात शुक्रवारी घडली आहे.या घटनेनंतर पतीने स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून प्रकरणाचा तपास करीत आहे.या कृत्यामागील कारण अद्याप कळू शकले नाही.भांडणावरून हे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अल्लाहबक्श शेख (28),शबनम शेख(22) आणि अशफिया शेख (2)असे मयत झालेल्यांची नावे आहे. अल्लाहबक्श हा एका विद्युत केंद्रात वेल्डिंगचे काम करायचा.या पती पत्नीमध्ये सतत भांडण व्हायचे.घरातील इतर सदस्य देखील त्या दिवशी एका लग्न सोहळ्याला गेले होते.त्या दिवशी देखील दोघांचे वाद झाले आणि वाद इतके विकोपाला गेले की पतीने रागाच्या भरात येऊन आपल्या पत्नीचा गळा चिरला. झालेल्या प्रकाराला बघून लहान चिमुकली रडू लागली तर तिचाही गळा त्याने चिरला.मुलगी आणि पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.ते बघून त्याला पश्चाताप होऊन त्याने स्वतःला गळफास घेऊन संपविले.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 
घटनेच्या दिवशी कुटुंबातील इतर सदस्य बाहेरगावी गेले होते.घरी आल्यावर त्यांना या घटनेबाबत कळले.त्यांनी पोलिसांना बोलावले.पोलिसांनी येऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहे.आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.