मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (19:48 IST)

लोकलच्या लेडीज डब्यात साप, व्हिडीओ व्हायरल!

Snake in mumbai local:  लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखले जाते. मुंबईच्या धावत्या प्रवासात लोकल हे मोठे साधन आहे. लोकलमध्ये दररोज काही नकाही घडत असते. जागे वरून दररोज महिलांचे भांडण होत असते. महिलांच्या कुजबुज गप्पांचे आवाज येत असतात. दररोज महिलांच्या डब्यात तर गजबज असते. पण महिलांच्या डब्यात साप शिरल्याची घटना आज घडली आहे. महिलांच्या डब्यात कोणीही शिरू शकत नाही पण सापाने डब्यात धुमाकूळ घातला. डब्यात साप बघून आरडाओरड होऊ लागला.साप चक्क वेटोळे घालून बसला होता. प्रवाशांची तारांबळ उडाली. ज्या डब्यात प्रवाशांची गर्दी असते. पाय ठेवायला जागाच नसते तिथे सापाला बघून जागा मोकळी करू लागले. प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन प्रवास केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. @aamchi_mumbai या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by