बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (10:38 IST)

पुढील दोन दिवसात राज्यात थंडीचा जोर कमी होणार, हवामान खात्याची माहिती

राज्यात थंडीला सुरूवात झाली आहे. विदर्भ, मराठवाडा तसेच पुणे, मुंबईत ही थंडीला सुरूवात झाली. गेल्या दोन दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात घट झाली होती. त्यामुळे राज्यात गुलाबी थंडीची चाहुल लागली होती. पुणेकरांनी दोन दिवसात बोचऱ्या थंडीचा सामना केला. पुण्यातील तापमान हे १० अंश सेल्सियस पर्यत घसरले होते. मात्र पुढील दोन दिवसात राज्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
 
पुणे हवामान खात्याचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, सध्या हवा ही उत्तर पूर्वेकडून दक्षिण दिशेने वाहत आहे. त्यामुळे उत्तरेकडील थंड वारे राज्यात येत असल्याने हवामानात मोठी घट झाली आहे. पुण्यासह राज्यातील काही भागात उद्यापासून थंडी काही प्रमाणाक कमी होणार आहे. असे असले तरी उत्तर भारतीयांना मात्र थंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत राज्यात कमी थंडी अनुभवायला मिळणार आहे. असे असले तरी पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे. त्यानंतर राज्यातील तापमान एखाद्या अंशाने वाढणार आहे.