गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मार्च 2023 (11:44 IST)

होळीच्या दिवशी कुटुंबाचा शेवट

छत्रपती संभाजीनगर :  समृद्धी महामार्गावर सतत अपघात सुरूच आहेत. आजही समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जवळ एक भीषण अपघात झाला, यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
 
आपल्या स्विफ्ट कारने राठोड कुटुंबीय समृद्धी महामार्गावरुन शिर्डीहून नागपूरला घराकडे परतत होते. समृद्धी महामार्गावर लासुर स्टेशन येथे हडस पिंपळगाव जवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.
 
स्विफ्ट कारने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. स्विफ्ट कार आणि ट्रकची धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.