शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (10:01 IST)

शिवसेनेचे माजी खासदार यांना माजी म्हटल्याने भडकले

माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीतील पराभव अत्यंत जिव्हारी लागला, ते अजूनही हे विसरू शकलेले नाही. हे पुन्हा दिसून आले असून त्यांचा संताप आज पुन्हा दिसून आला तो बांधकाम व्यावसायिकांची संघटना अर्थात क्रेडाईच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमात ओळख आणि इतर मान्यवरांची नावे घेताना त्यांचा सतत माजी खासदार असे संबोधण्यात आल्याने त्यांनी चांगलंच यावेळी ऐकवले आहे.  त्यात कळीचा मुद्दा म्हणजे याच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनीही खैरेंना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही.
 
कार्यक्रमातील वक्त्यांकडून माजी खासदार असा उल्लेख करण्यात येत होता. यावर खैरे म्हणाले, “मी कार्यक्रमात आल्यापासून बघतोय माझा उल्लेख माजी खासदार म्हणून केला जातोय. काय माजी खासदार, माजी खासदाय लावलंय… मी आजही शिवसेनेचा नेता आहे आणि लोक माझ्याकडे त्यांची कामे घेऊन येतात.” एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनीही खैरेंना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. “मी खासदार झालोय, याच्यावर अजूनही काही लोकांचा विश्वासच बसत नाही,” असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यामुळे अजूनही खैरे यांना त्यांचा पराभव रुचलेला नाही हेच दिसून येतेय.