गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (08:24 IST)

वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची : जयंत पाटील

Jayant Patil
वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
 
2014 ला मोदींना पाठिंबा आणि 2019 ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर, अशी जोरदार खिल्ली जयंत पाटील यांनी राज ठाकरेंची उडवली आहे. पुतण्या माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी आहे. वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.