मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (15:07 IST)

दुसऱ्या पत्नीनेही दोन मुलांसह विहिरीत जीवनं संपवलं; बार्शी तालुका हादरला

सोलापूर – बार्शी तालुक्यातील एका गावात एका विवाहित महिलेने आपल्या दोन चिमूरड्यांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, आणखी भयानक गोष्ट म्हणजे या महिलेच्या सवतीने सुमारे पाच वर्षांपूर्वी आपल्या दोन मुलांसह याच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती, अशा प्रकारे एकाच माणसाच्या दोन बायकांनी लागोपाठ पाच वर्षात आपल्या चार मुलांसह जीवन यात्रा संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे, तसेच या प्रकरणाची उलट सुलट चर्चा सुरू आहे.
 
सगळीकडे सणासुदीच्या आनंद म्हणजेच नवरात्रोत्सवाचा जल्लोष सुरू असताना कुसंळब या गावात एक भयानक दुर्दैवी घटना घडली बाबासाहेब काशीद (वय ३५) या इसमाची दुसरी पत्नी रोहिणी (लग्नानंतरचे नाव अनुराधा) हिने आपल्या अनिश (वय २) आणि अक्षरा (वय ४ महिने) या बालकांसह पाण्याने भरलेल्या काठोकाठ भरलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. विशेष म्हणजे सुमारे पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये बाबासाहेब यांची पहिली पत्नी अनुराधा काशीद हिने आपली मुलगी अक्षरा (वय ३) आणि आदिती (वय ५) हिने दोघींना स्वतःच्या कमरेला साडीने बांधून घेत सन २०१७ रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर बाबासाहेब काशीद यांनी रोहिणी हिच्याशी २०१९मध्ये दुसरा विवाह झाला होता. त्यांना ३ वर्षात २ मुले झाली. त्यानंतर काल गुरूवारी रागाच्या भरात रोहिणी उर्फ अनुराधा हिनेदोन चिमुरड्यांना घेऊन विहिरीत उडी मारत आपले जीवन संपवले.
 
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहीर काठोकाठ भरलेल्या मोटार लावून विहिरीतील पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पाणी जास्त असल्याने त्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी अग्निशमन दलाला मदतीला विनंती केली. खूप प्रयत्ननंतर काल संध्याकाळी या तिघांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. या घटनेची बार्शी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे बार्शी तालुक्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

Edited by : Ratnadeep Ranshoor