बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 मार्च 2022 (15:54 IST)

गर्लफ्रेंडचे दोन प्रेमी भर चौकात भिडले

कल्याणमध्ये (Kalyan) प्रेम प्रकरणातून धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून भर चौकात दोन जणांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यातील एका कार चालकानं त्याच्याशी वाद घालणाऱ्या व्यक्तीला फरफटत नेलं. सुदैवानं या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
 
हा धक्कादायक प्रकार कल्याण पश्चिम आधारवाडी चौकात घडला. ही घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. मात्र शहर पोलीस या प्रकरणात काय कारवाई करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.