पत्नीने पतीला जिवंत जाळून निर्घृण हत्या केली
भांडण प्रत्येक जोडप्यात होतात.पण एखाद्याने विकोपाला जाऊन असे काही करावे हे धक्कादायकच आहे.रागाच्या भरात येऊन एका महिलेने आपल्या पतीची पेट्रोल घालून त्याला पेटवून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बेंगळुरू येथे घडली आहे. इतकेच नाही तर पेटवून आपल्या पतीच्या डोक्यात दगड देखील घातला.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.कर्नाटकातील तुमकूर या भागाची ही घटना आहे.
याचे कारणं असे की या जोडप्याचे लग्न होऊन 8 वर्ष झाले होते.या जोडप्याला तीन मुली असल्याचे समजले आहे.या जोडप्याचे सततचे भांडण होत असे.कारण त्यामहिलेचे आपल्या शेजाऱ्याशी अनेतिक संबंध होते.पुन्हा भांडण झाल्यावर पत्नीला पतीचा राग आला आणि तिचा हा राग अनावर झाला.शेवटी तिने रागाच्या भरात येऊन आपल्या पतीच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि त्याला पेटवले.पतीनं आपले जीव वाचविण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला.पण पत्नीने त्याला नाल्यात ढकलून दिले आणि त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. नंतर तिने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हा केल्याची कबुली दिली.मी आपल्या पतीच्या छळाला कंटाळून असे केल्याचे तिने सांगितले.आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे.