गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (07:18 IST)

अशा बातम्यांमध्ये काही तथ्य नसतं : अजित पवार

राज्यात उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे तर विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे असेल असंही बोललं जात आहे. यावर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान असणाऱ्या अजित पवारांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे विधानसभा अध्यक्षपद जाणार असल्याच्या वृत्तावर बोलताना ते म्हणाले की, “अशा बातम्यांमध्ये काही तथ्य नसतं. महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली. त्यावेळी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसून जे निर्णय घेतले त्यांची अमलजबजावणी सगळे करत आहोत”. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर बोलताना हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं.