गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (16:19 IST)

या पोलीस निरीक्षकांचे तडकाफडकी निलंबित

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कारागृह फोडून आरोपींच्या पलायन प्रकरणी ६ पोलिसांच्या निलंबनाच्या कारवाई नंतर राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
 
गेल्या २० दिवसांपूर्वी राहुरी कारागृहाचे मागील बाजुचे खिडकीचे गज कापून मोक्का गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या टोळी प्रमुखासह ५ जण फरार झाले होते. त्यातील तीन आरोपींना पकडण्यात यश आले मात्र २० दिवसानंतर राहुरीच्या पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
 
शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यातील कारागृहात मोक्का गुन्ह्यात अटक असलेल्या कुख्यात टोळी प्रमुख सागर भांड,किरण आजबे, सोन्याबापू माळी, रवी लोंढे, जालिंदर सगळगिळे आदी आरोपी यांनी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पलायन केले होते.
 
दरम्यान राहुरी न्यायालय परिसरात भांड व आजबे यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते तर तिसरा आरोपी सगळगिळे यास मनमाड रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले होते.मात्र सोन्याबापू माळी व रवी लोंढे हे अद्यापही फरार असून पोलीस
 
त्यांचा शोध घेत असून ते अद्याप सापडलेले नाही. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या सह सहा पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होते.बुधवार दिनांक ५ जानेवारी रोजी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके राहुरी पोलीस ठाण्यात.
अचानक दाखल होऊन कारागृहाची पाहणी करून राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना निलंबनाची नोटीस बजविण्यात आली.