गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (10:51 IST)

येत्या १० मार्चपासून 'कासव महोत्सवा' चे आयोजन

कोकण किनारपट्टीवर अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या ऑलिव्ह रिडल सागरी कासवांच्या विणीचा हंगाम सुरु झालाय. 'कासवांचे गाव' म्हणून ओेळख मिळालेल्या मंडणगड तालुक्यातील 'वेळास' गावाच्या किनारपट्टीकडे पुन्हा कासवं अंडी घालण्यासाठी येऊ लागली आहेत. जवळपास १५ कासवांच्या अंड्यांची घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. यात जवऴपास १७६७ अंडी आहेत. लवकरच या अंड्यातील पिल्ले समुद्रात झेपावणार आहेत.  या दुर्मिळ कासवांना पाहण्यासाठी किनाऱ्यावर येत्या १० मार्चपासून 'कासव महोत्सवा'चं आयोजन करण्यात आलंय. पर्यटन महामंडळाच्या आणि कासवमित्रांच्या माध्यमातून हे अनोखे पाहुणे समुद्रात झेपावताना पर्यटकांना पाहण्याची संधी मिळणार आहे.