सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (08:01 IST)

भीषण अपघातात माजी अर्थमंत्र्यांच्या बहीण आणि भावोजीचा दुदैवी मृत्यू

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबा जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भाजपचे नेते तथा माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चूलत बहीण आणि भाऊजी जागीच यात ठार झाले आहे.सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहीण ममता तगडपल्लेवार आणि भाऊजी विलास तगडपल्लेवार हे दोघे पुसद येथून स्वतःच्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. तींतरवणी येथे चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटले.
 
माहितीनुसार बुधवारी रात्रीच्या सुमारास गेवराई तालुक्यातील चकलांबा गावानजीक एक भरधाव कार पुलावरून खाली पडून भीषण अपघात झाल्याचे समोर आले होते. या अपघात ममता तगडपल्लेवार आणि विलास तगडपल्लेवार या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले होते. हे दाम्पत्य माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि भावोजी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत तगडपल्लेवार दाम्पत्य पुसद येथून स्वतःच्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. त्यावेळी दुर्देवी अपघात झाला. तिंतरवणी येथे ही गाडी भरधाव असल्याने पुलाखाली जाऊन अपघात झाला. यामध्ये दोघे पती पत्नी जागीच ठार झाले.