सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 एप्रिल 2022 (14:26 IST)

पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

भरधाव वेगाने आलेल्या कारने दुसऱ्या कारला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात कारचालकासह एक अनोळखी इसम जागीच मृत्यूमुखी पडला आहे. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावर फुरसुंगी फाटा येथे घडली आहे. 
 
या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. कारचालक श्रीनिक प्रभाकर होले व एक अनोळखी इसम हे दोघे मयत झाले आहेत. तर दुसरा कारचालक अनिल मारुती जाधव यासह सुनिल निलेश शितकल व संकेत बाळु भंडलकर हे गंभीर जखमी झाले आहेत.