1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

उदयनराजे भोसले संतापले म्हणाले राजेशाही असती तर...

सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दुष्काळावर बोलताना जनतेलाचा दुष्काळावर निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. लोकशाही आहे म्हणून तुम्ही राजे आहात. त्यामुळे दुष्काळावर तुम्हीच निर्णय घ्यायचा आहे, मात्र जर राजेशाही असली असती, तर मी कधीच दुष्काळ निवारणाचा निर्णय घेऊन टाकला असता असे त्यांनी पंढरपुरात विठ्ठलाला दुष्काळ निवारणाचे साकडे घालण्यासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
 
उद्यनराजे भोसले पुढे म्हणाले की या देशात लोकशाही आहे, येथील नागरिक हेच  लोकशाहीचे राजे आहेत. त्यामुळे त्यांनीच कष्टकरी, शेतकऱ्यांना त्रासातून मुक्त करावे लागणार आहे. जर  राजेशाही असली असती, तर मी कधीच दुष्काळ निवारणाचा निर्णय घेऊन रिकामा झालो असतो. असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.  पाण्यावरुन होत असलेल्या राजकारणावर ते म्हणाले की कोणताही प्रकल्प होताना ज्या-त्या तालुक्याला पाणी आरक्षित ठेवले जाते. हे आरक्षित पाणी ज्या-त्या तालुक्याला मिळावे हीच लोकांची मागणी होती. मी कुठलेही राजकारण करण्यासाठी बसलेलो नाही. मला जनतेची सेवा करायची आहे. भोसले यांचे पंढरपूरमध्ये आल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले होते.