बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (18:54 IST)

6 डिसेंबर ला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची वर्षा गायकवाड यांची मागणी

varsha gaikwad
6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मुंबईत सहकारी व खासगी कार्यालयासह सुट्टी जाहीर करण्याची मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी मोठ्या संख्येने दाखल होतात. मात्र या दिवशी कार्यालय  मध्ये सुट्टी नसल्याने अभिवादन करणे शक्य नाही. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सुट्टी जाहीर करावी. अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. 
 
 
 
Edited by - Priya Dixit