शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 जुलै 2023 (16:07 IST)

Vashi : वाशीतील शाळेच्या शौचालयात मुलीचा मृतदेह आढळला

वाशीतील एका शाळेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाशीतील शाळेत सहावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला आहे. मुग्धा कदम असे या मयत मुलीचे नाव आहे. 

वाशीतील शाळेतील इयत्ता सहावीत ही विद्यार्थिनी कोपरखैरणेला राहणारी होती. सकाळी शाळेत आल्यावर  10 वाजेच्या सुमारास ती तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात गेली. बराच काळ उलटला तरीही ती वर्गात परतली नाही.

तिच्या वर्गातील इतर विद्यार्थिनींनी शिक्षिकेला ही माहिती दिली. नंतर तिचा शोध घेणं सुरु झालं. तिला शोधत असताना शाळेतील स्वच्छताकर्मी तिसऱ्या मजल्यावर गेली. तिला शौचालयाचे दार आतून बंद असल्याचे समजले. तिने दार ठोठावल्यावर तिला कोणतेही प्रतिसाद मिळाले नाही. हे तिच्या लक्षात आल्यावर तिने धावत जाऊन शिक्षिकेला ही माहिती दिली. नंतर शौचालयाचे दार तोडण्यात आले. तेव्हा ती बेशुद्ध  आढळली. तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीनं घातस्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनास पाठविले. विद्यार्थिनी आजाराने ग्रस्त असून काही वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.  
 
 




Edited by - Priya Dixit