मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (17:08 IST)

मनसेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण तापले आहे. येत्या २२ ऑगस्टला राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवल्यास ठाणे बंद करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. विशेष म्हणजे या मुद्द्यावरून ठाण्यातील मनसैनिक कमालीचे संतप्त झाले असून २२ ऑगस्ट रोजी कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सरकार जबाबदार असेल, असा इशाराच जाधव यांनी दिला आहे .
 
ईव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे यांनी देशभर आंदोलन केल्यामुळेच सरकारकडून हा राजकीय सूड उगवला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी लगावला. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून ठाण्यात यामुळे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे सांगितले आहे.