गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (11:22 IST)

किरीट सोमय्या यांचा 'हा' फोटो व्हायरल का होतोय?

भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील एक फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. किरीट सोमय्या मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसल्याचं या फोटोत दिसून येतं.
 
हा फोटो नेमका कधीचा आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे सोमय्या यांच्या आजूबाजूला फायलींचा ढिगारा आहे
 
किरीट सोमय्या अनेकदा माहितीच्या अधिकाराचा वापर करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे यापैकीच एका प्रकरणासंबंधी हा फोटो असावा अशीही चर्चा आहे.
 
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्या यांना मंत्रालयात थेट प्रवेश कसा मिळाला यावर आक्षेप घेतला आहे. सोमय्या कोणत्या अधिकारात याठिकाणी गेले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.