शिरुरमध्ये न्यायालयाच्या परिसरात गोळीबार, पत्नीचा जागीच मृत्यू
पुणे जिल्ह्यातल्या शिरुरमध्ये न्यायालयाच्या परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आणि सासूवर भरदिवसा न्यायालयीन परिसरात गोळीबार केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर सासुची प्रकृती गंभीर आहे. कौटुंबिक वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून सासु वरती सध्या शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी सध्या शिरूर पोलिस दाखल झाले असून भरदिवसा न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.