बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सोशल मिडीयावर पुणे येथील एस.पी.ज बिर्याणीची छीथू, बिर्याणीत अळया तर ग्राहकाला हॉटेलने सुनावले

पुणे येथील सर्वात प्रसिद्ध असलेल्या एस.पी.ज बिर्याणीची सोशल मिडीयावर जोरदार छीथू झाली आहे. यामध्ये एका ग्राहकाच्या बिर्याणीत अळया आढळल्या होत्या त्याने तक्रार केली मात्र तक्रार तर सोडा मुजोरी करत या हॉटेलने माफी मागितली असे दाखवत त्या ग्राहकाला अरेरावी करत जोरदार सुनावले त्यामुळे ग्राहकाचा हा व्हिडियो जोरदार व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुणे येथील या प्रसिद्ध असलेल्या बिर्याणी हाऊस विरोधात पुणेकर एकत्र आले असून त्यावर कारवाई करा असा सूर सोशल मिडीयावर आहेच सोबतच अनेकांनी आता या हॉटेलात पुन्हा पाय ठेवणार नाही असे सांगितले आहे. 
 
त्यामुळे पूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या हा हॉटेलवर आता जोरदार परिणाम दिसून येणार आहे. पुण्यात बिर्याणीसाठी प्रसिद्ध असलेल्या एस.पी.’ज बिर्य़ाणी या ठिकाणी बिर्याणीमध्ये आळ्या सापडल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार ग्राहकाने उघडकीस आल्यानंतर एस.पी.’ज बिर्य़ाणी हाऊसच्या मालकांनी आरेरावी केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. 
 
विरेंद्रसिंग ठाकूर हे सदाशिव पेठेतील एस.पी.’ज बिर्याणी हाऊस येथे मुलासोबत जेवणासाठी गेले होते. त्यांनी बिर्याणीची ऑर्डर दिली होती. त्यांना देण्यात आलेल्या बिर्याणीमध्ये आळ्या आढळल्या. ठाकूर यांनी याचा व्हिडीओ काढून घेऊन ही बाब हॉटेल प्रशासनाच्या नजरेस आणून दिली. मात्र, हॉटेल प्रशासनाने या बाबद दिलगीरी व्यक्त करण्या ऐवजी आरेरावी केली.चटकदार बिर्याणीचे खवय्यांचे पुरेपुर लाड पुरविणाऱ्यासाठी “एस.पी.’ज बिर्याणी पुण्यात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आज या ठिकाणी बिर्य़ाणीमध्ये आळ्या सपडल्याने पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरु आहे का असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केली आहे. या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करुन आज झालेल्या प्रकाराबदल हॉटेल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.