गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 डिसेंबर 2020 (16:27 IST)

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गच्चीवर पार्टी करता येणार नाही

महाराष्ट्र सरकारने मुंबईत पाच जानेवारी पर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गच्चीवर पार्टी करण्याचा विचार करत असाल तर सावधान! कारण गच्चीवरही तुम्हाला पार्टी करता येणार नाही. ३५ हजार पोलीस अशा पार्टींवर नजर ठेवणार आहेत. 
 
नाईट कर्फ्यूच्या आदेशानुसार, पाच पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येणावर बंदी आहे. निर्बंध असले तरी, मुंबईकरांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू, गोराई आणि मढ या ठिकाणी संध्याकाळपासून जाऊ शकतात. पण छोट्या गटाने, चारपेक्षा कमी लोक असले पाहिजेत. पोलीस या ठिकाणी गर्दी जमू देणार नाहीत, असे पोलीस सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील म्हणाले आहेत.
 
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यावर ३५ हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. नव वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी तसेच कोविड-१९ नियमांचे काटेकोटरपणे पालन होतेय की नाही त्यावर तैनात पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल, असे नांगरे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. नाईट कर्फ्यूच्या निर्बंधामुळे हॉटेल, पब रात्री ११ वाजता बंद करावे लागतील. जर असे केले नाही, तर परिणाम भोगावे लागतील. बोटीवर तसेच गच्चीवर पार्ट्यांना परवानगी नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास आयोजकांवर आणि गर्दीवर कारवाई करण्यात येईल असे नांगरे पाटील यांनी सांगितले. बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच ड्रींक अँड ड्राइव्ह विरोधात वाहतूक पोलीस दरवर्षीप्रमाणे मोहीम राबवतील.