सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2017 (15:18 IST)

कोल्हापूरचा जावई झहीर-सागरिका अंबाबाई चरणी

  • कोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतल आहे.करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी माथा टेकत आशीर्वाद घेतला आहे. जाहीर आणि सागरिका यांनी 23 नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. लग्न झाले त्या नंतर पारंपारिक पद्धतीने कोल्हापूरच्या अंबाबाईचं दोघांनी दर्शन घेतलं आहे.  यावेळी देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देवून या नवीन जोडीचा  सन्मान केला आहे.झहीर खान आणि सागरिका यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती. झहीर - सागरिका यांच्या लग्नाचं रिसेप्शन 28 नोव्हेंबरला मुंबईत आयोजित केले होते. या रेसेप्शनला क्रिकेट व बॉलिवूडमधील दिग्गज यावेळी उपस्थित होते. रिसेप्शन पार्टी मुंबईतील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली आहे.