गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मागोवा 2008
Written By वेबदुनिया|

बिग बँग महाप्रयोगचे वर्ष

ND
विश्वाची ‍निर्मिती कशी झाली? याचा शोध घेण्यासाठी 'बिग बँग' हा प्रयोग यावर्षी झाला. या महाप्रयोगासाठी जगातील सर्वात मोठी महामशीन तयार करण्यात आली. या मशीनद्वारे वेगाने प्रोटॉनच्या कणांची टक्कर घडविण्यात आली. परंतु, हा प्रयोग यशस्वी झाला नाही. प्रयोग यशस्वी झाला असता तर विज्ञान आणि आरोग्याच्या क्षेत्रात क्रांतीकारक बदल झाले असते.

'बिग बँग' प्रयोगासाठी तयार केलेले 'हैड्रॉन कोलाइडर' हे महामशीन युरोपियन ऑर्गेनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्चने तयार केले होते. याचा उद्देश 'हाय एनर्जी फिजिक्स' चा शोध घेण्याचा होता. वैज्ञानिकांनी या प्रयोगास जगा‍तील सर्वांत मोठा प्रयोग म्हणून नाव दिले होते.

महाप्रयोगाच्या यशामुळे आरोग्याच्या क्षेत्रात क्रांतीकारक बदल होण्याच्या अपेक्षा होत्या. या प्रयोगातून निघणार्‍या प्रोटॉन, कार्बन आयन आणि एंटी-मॅटरच्या पार्टिकल बीममुळे कर्करोगावर उपचार शक्य आहे.

आतापर्यंत कर्करोगाच्या रेडिएशन थेरेपीमध्ये कर्करोगाच्या उतीबरोबर आरोग्यासाठी लाभदायक असणार्‍या उतीही नष्ट होत होत्या. परंतु, पार्टिकल बीम यशस्वी झाले तर शरीराच्या आरोग्यवर्धक उतीचे कोणतेही नुकसान न होता केवळ ट्यूमरलाच आपले लक्ष्य करता येईल.

ND
कशी होती महामशीन : महामशीन एक 3.8 मीटर रुंद सुरुंगमध्ये ठेवण्यात आली होती. हे सुरूंग फ्रॉन्स आणि स्विझर्लंडच्या सीमेवर होते. या कोलायडर मशीनमध्ये दोन समांतर बीम पाईप लावण्यात आले होते. त्याचबरोबर त्यात काही डायपोल आणि क्वाड्रुपल चुंबकाचा प्रयोगही करण्यात आला होतो. हे महामशीन सुरू होताच त्यात दोन 'प्रोटॉन' ची एकमेकांशी टक्कर घडविण्यात येणार होती. हे मशीन सुरू केल्यानंतर एका वर्षातच 5.6 कोटी सीडीभरतील इतका डाटा तयार झाला असता. या डाटाचे विश्लेषण करण्यासाठी जास्त सक्षम सिस्टीम तयार करावी लागणार होती.

महाप्रयोग कसा होता : या प्रयोगात प्रोटॉनच्या एका बीमला शिशाच्या तुकड्यावर टाकण्यात आले. त्यातून सब-अटॉमिक पार्टिकल, 'न्यूट्रॉन' निघाला. या न्यूट्रॉनच्या माध्यमातून अंतराळातील अणू कचरा स्वच्छ करता आला असता. या महाप्रयोगात प्रोटॉन सिंक्रोटोनमधून निघालेल्या बीम कॉस्मिक किरणांमुळे काय परिणाम होईल याचा अभ्यास करता येणार होता.

महाप्रयोग अयशस्वी ठरण्याची कारणे: करोडो डॉलर किंमतीच्या बिग बँग प्रयोगात चुंबक खूप तापले. यामुळे दुसर्‍या भागास उशीर झाला. तसेच चुंबक तापल्यामुळे हॅड्रान कोलायडर चालविण्यात काही अडचणी आल्या. यामुळे महामशीनचे काम थांबवावे लागले.