रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

पितृपक्ष 2019: 3 संख्या अती महत्त्वाची

धर्मशास्त्रांप्रमाणे पितरांचे पितृलोक चंद्राच्या उर्ध्वभागात असल्याचे मानले गेले आहे. दुसर्‍या बाजूला अग्निहोत्र कर्माने आकाश मंडळाचे सर्व पक्षी देखील तृप्त होतात. पक्ष्यांचे लोक देखील पितृलोक असल्याचे सांगितले गेले आहे. 
 
तसेच काही पितर आमच्या वरुणदेवाचा आश्रय घेतात आणि वरुणदेव पाण्याची देवता आहे. म्हणून पितरांची स्थिती पाण्यात देखील सांगण्यात आली आहे.
 
तीन वृक्ष:-
1. पिंपळाचा झाड : पिंपळाचं झाडं अत्यंत पवित्र असतं. यात प्रभू विष्णूंचा वास असतो तसेच हे वृक्ष रूपात पितृदेव आहे. पितृ पक्षात या झाडाची उपासना केल्याने किंवा हे झाडं लावल्याने विशेष शुभ प्राप्ती होते.
 
2. वडाचं झाड : वडाच्या झाडात साक्षात महादेवांचा वास असतो. पितरांना मुक्ती मिळालेली नाही अशी भावना असल्यास वडाच्या झाडाखाली बसून महादेवाची पूजा-आराधना करावी.
 
3. बेलाचं झाड : पितृ पक्षात महादेवाला अती प्रिय बेलाचं झाड लावल्याने अतृप्त आत्म्याला शांती मिळते. अमावास्येला महादेवाला बेल पत्र आणि गंगाजल अर्पित केल्याने सर्व पितरांना मुक्ती मिळते. या व्यतिरिक्त अशोक, 
 
तुळस, शमी आणि केळीच्या झाडाची पूजा केली पाहिजे.
 
 
तीन पक्षी:-
1. कावळा : कावळ्याला अतिथी आगमनाचं सूचक आणि पितराचं आश्रम स्थळ मानले गेले आहे. श्राद्ध पक्षात कावळ्याचं खूप महत्त्व आहे. या पक्षात कावळ्यांना आहार देणे अर्थात आपल्या पितरांना भोजन देण्यासारखे मानले 
 
गेले आहे. शास्त्रांप्रमाणे कोणतीही सक्षम आत्मा कावळ्याच्या शरीरात स्थित होऊन विचरण करू शकते.
 
2. हंस : पक्ष्यांमध्ये हंस एक असा पक्षी आहे ज्यात देव आत्मा आश्रय घेते. या त्या आत्म्यांचे ठिकाण आहे ज्यांनी जीवनात पुण्यकर्म केले आहे, ज्यांनी यम-नियमाचे पालन केले आहे. काही काळ हंस योनीत राहून आत्मा 
 
चांगल्या काळाची वाट बघत पुन्हा मनुष्य योनीत परततात किंवा देवलोकात गमन करतात.
 
3. गरूड : गरूड हे प्रभू विष्णूचे वाहन आहे. देव गरूडांच्या नावावरच गरूड पुराण आहे. ज्यात श्राद्ध कर्म, स्वर्ग नरक, पितृलोक इतर उल्लेख सापडतं. पक्ष्यांमध्ये गरूडाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. प्रभू रामाला मेघनाथाच्या 
 
नागपाशातून मुक्ती देणारे गरूडाचा आश्रय घेतात पितर... या व्यतिरिक्त क्रौंच किंवा सारस यांचे नाव देखील घेतले जातात.
 
तीन पशू:-
1. कुत्रा : कुत्र्याला यमदूत मानले गेले आहे. कुत्र्याला सूक्ष्म जगातील वस्तू देखील दिसतात असे मानले गेले आहे. कुत्रे भविष्य होणार्‍या घटना आणि सूक्ष्म आत्मा बघण्यात सक्षम असतात. कुत्र्याला हिंदू देवता भैरव महाराजांचा 
 
सेवक मानले गेले आहे. कुत्र्याला भोजन दिल्याने भैरव महाराज प्रसन्न होतात आणि प्रत्येक प्रकाराच्या संकटांपासून भक्तांची रक्षा करतात. कुत्र्याला पोळी दिल्याने पितरांची कृपा राहते.
 
2. गाय : गायीमध्ये सर्व देवी- देवतांचा वास असल्याचे सांगितलं जातं. मान्यतेनुसार 84 लाख योनीचा प्रवास केल्यावर अंतिम योनीच्या रूपात गाय होतात. गाय लाखो योनीचा तो टप्पा आहे जेथे आत्मा विश्राम करून पुढील 
 
प्रवास सुरू करते.
 
3. हत्ती : हत्तीला हिंदू धर्मात गणपती बाप्पाचे साक्षात रूप मानले गेले आहे. हत्ती इंद्राचे वाहन देखील आहे. हत्तीला पूर्वजांचे प्रतीक मानले गेले आहे. ज्या दिवशी एखाद्या हत्तीचा मृत्यू होतो त्या दिवशी त्याचा कोणताही साथी 
 
भोजन करत नाही. हत्तीमध्ये आपल्या पूर्वजांची स्मृती शेष असते. या व्यतिरिक्त वराह, बैल आणि मुंग्यांचा उल्लेख करण्यात येतो. मुंग्यांना कणीक देणारे आणि लहान-लहान चिमण्यांना तांदूळ घालणारे वैकुंठात गमन करतात.  
 
3 जलचर जीव:-
1. मासोळी : प्रभू विष्णूंनी एकदा मत्स्य अवतार घेऊन जलप्रलयापासून मनुष्य जातीचं अस्तित्व वाचवलं होतं. जेव्हा श्राद्ध पक्षात तांदळाचे लाडू तयार केले जातात त्यांना पाण्यात विसर्जित केलं जातं.
 
2. कासव : प्रभू विष्णूंनी कच्छप अवतार घेऊन देव आणि असुरांसाठी मदरांचल पर्वत आपल्या पाठीवर स्थापित केले होते. हिंदू धर्मात कासव अत्यंत पवित्र जीव आहे.  
 
3. नाग : भारतीय संस्कृतीमध्ये एक रहस्यमय जीव असल्यामुळे नागाची पूजा केली जाते. हे देखील पितरांचे प्रतीक मानले गेले आहे. या व्यतिरिक्त मगराचा उल्लेख देखील करण्यात आले आहे.