बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified गुरूवार, 29 जुलै 2021 (09:20 IST)

श्रावणमध्ये या 5 वस्तूंचे सेवन करा, भरपूर ऊर्जा मिळेल

पावसाळ्यात इतर हंगामाच्या तुलनेत पाचक प्रणाली कमकुवत होते. अशात उपवास करत असणार्‍यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण की जेव्हा पाचन तंत्रावर परिणाम होतो तेव्हा प्रतिकारशक्ती कमकुवत होण्यास सुरवात होते. तर जाणून घ्या की श्रावणात उपास करताना कोणत्या प्रकारे फळाहार करावा ज्याने एनर्जी कायम राहील. 
 
1. सकाळी 1 ग्लास दूधाचं सेवन करावं. यासोबत आपण केळी देखील खाऊ शकतात किंवा बादाम खाऊ शकतात. याने वारंवार भूक लागल्यासारखं जाणवणार नाही. दुधात कॅल्‍शियम, प्रो‍टीन, व्हिटॅमिन बी -2 आढळतं आणि केळीत पोटेशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळतं ज्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
 
2. कधीही रिकाम्या पोटी राहू नये. याने आपल्याला अॅसिडिटी, पोटदुखी, डोकेदुखी असे त्रास उद्भवू शकतात. त्याऐवजी मुठभर सुके मेवे खावे.
 
3. शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ खाणे योग्य ठरेल. त्यात आढळणारे फायबरने फायदा होईल. पुन्हा पुन्हा भूक जाणवणार नाही, अशक्तपणा जाणवणार नाही आणि पोट देखील भरले.
 
4. पाणीदार फळांचे सेवन करावे. या दरम्यान शरीरात पाण्याची कमी होता कामा नये. याने कमजोरी जाणवू लागते. शरीरात पाण्याची कमी असल्यास अशक्तपणा जाणवतो.
 
5. 1 वाटी दह्याचे सेवन करावे. दही लो फॅट असावं. याने पाण्याची कमतरता जाणवणार नाही. शरीर हायड्रेटेड राहील. आप यात फळं आणि ड्राय फुट्स देखील मिसळू शकता.