बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 14 एप्रिल 2018 (09:36 IST)

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धा : मेरी कोमला सुवर्णपदक

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सर मेरी कोमने भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे. 48 किलो वजनी गटात मेरी कोमने बाजी मारली. अंतिम फेरीत नॉर्दन आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर मात करत, मेरी कोमने सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. भारताच्या खात्यात आता 43 पदकं जमा झाली असून, यात 18 केवळ सुवर्ण पदकं आहेत. भारताच्या एकूण पदकांमध्ये 18 सुवर्ण, 11 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे.

गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी
2002 (मॅन्चेस्टर) - 69 पदकं

2006 (मेलबर्न) - 50 पदकं

2010 (दिल्ली) - 101 पदकं

2014 (ग्लास्गो) - 64 पदकं