गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (16:49 IST)

'भाई तो भाला मला दे तो माझाय...फायनलपूर्वी नीरजचा भाला घेऊन पाक खेळाडू भटकत होता

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक पटकावले आणि इतिहास रचून दिला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर सर्वच स्तरातून नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. ८७.५८ मी. लांब भाला फेकत नीरजने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. परंतू अंतिम फेरीवेळी नीरज मैदानावर आला तेव्हा तो प्रचंड तणावात होता. त्याला त्याचा भाला सापडत नव्हता. याबाबद नीरजने आता खुलासा केला आहे.
 
भालाफेकीच्या फायनलमध्ये नीरजसह पाकिस्तानाचा अरशद नदीम हा देखील सहभागी होता अन् त्याच्याही कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. फायनयपूर्वी भालाफेकीला जाण्यापूर्वी नीरजचा भाला गायब होता. नीरच तो भाला शोधताना त्याला तो भाला नदीमच्या हातात सापडला. नीरजचा भाला घेऊन नदीम मैदानावर भटकत होता, नीरजला हे कळताच त्यानं तो त्याच्याकडून घेतला.
 
नीरज म्हणाला की ऑलिम्पिक फायनलपूर्वी मी माझा भाला शोधत होतो, मला तो सापडत नव्हता. अचानक मला तो अर्षद नदीमच्या हाती दिसला. तो माझा भाला घेऊन मैदानावर फिरत होता. तेव्हा मी त्याला म्हणालो, 'भाई तो भाला मला दे तो माझाय... मला तो फेकायचा आहे'.. त्यानं मला तो परत केला त्यामुळेच मला पहिल्या प्रयत्नात चांगली कामगिरी करता आली नाही.
 
त्याचबरोबर, नीरज नदीमच्या खेळावरही खूश आहे आणि नदीमपासून प्रेरणा घेऊन पाकिस्तानात आणखी लोक भालाफेककडे आकर्षित होतील अशी आशा आहे.