शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , मंगळवार, 22 जानेवारी 2019 (14:29 IST)

हालेपचा धुव्वा उडवत सेरेना उपान्त्यपूर्व फेरीत

सेरेना विलिम्सने आपल आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सिमोना हालेपचा पराभव करत ऑस्ट्रेलिन ओपनच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, पुरुषांच्या एकेरी गटात ए. जेवरेवला पराभव पत्करत स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. अमेरिकेची खेळाडू असलेल्या सेरेनाने रामोनियाची अव्वल क्रमांकाची हालेपचा 6-1,4-6, 6-4 ने पराभव करत 24 व्या ग्रँडस्लॅम खिताबाकडे पाऊल टाकले आहे. उपान्त्यपूर्व फेरीत तिचा सामना सातव्या स्थानी असलेल्या झेक गणराज्चच्या कारोलिना प्लिस्कोवाशी होणार आहे. 
 
प्लिस्कोवाने दोनवेळची ग्रँडस्लॅम विजेती असलेल्या गर्बिने मुगुरूझा हिच्यावर 6-3, 6-1 ने सहज मात केली आहे. विजयानंतर सरेना म्हणाली मी लढाऊ आहे. मी कधीच हार मानत नाही. पुरुषांच्या एकेरी गटात जर्मनीचा चौथ्या स्थानी असलेल्या जेवरेवला कॅनडाच्या लियोस राओनिचकडून 6-1, 6-1, 7-6 (7/5) पराभवाचा सामना करावा लागला. आता सोळाव्या स्थानी असलेल्या राओनिचचा सामना फ्रान्सच्या 28 व्या स्थानी असलेल्या लुकास पाउले यच्याशी होणार आहे. लुकासने क्रोएशियाच्या अकराव्या स्थानी असलेल्या बोर्ना कोरिचचा 6-7 (4), 6-4, 7-5 (2) ने पराभव केला होता. महिलांमध्ये चौथ्या स्थानी असलेल्या नाओमी ओसाकाने लॅटवियाची अनास्तासिया सेवास्तोवाचा 4-6, 6-3, 6-3 ने पराभव केला आहे. अंतिम आठमध्ये तिचा सामना युक्रेनची एलिना स्वितोलिना हिच्याशी होणार आहे. जिने अमेरिकेची मेडिसन कीस हिचा 6-2, 1-6, 6-1 ने पराभव केला होता.