अरे बापरे WWE चे तीन मल्लाचा मृत्यू, दर्शकांना धक्का
लहान मोठे सर्वाना जगभरात कुस्तीप्रेमींसाठी WWE हा मोठा खेळ आहे. मात्र या व्यवसायीक कुस्तीसाठी गेले काही दिवस दु:खदायक राहिले आहेत. कारण एकाच दिवशी तीन पहिलवानांचा मृत्यू झाल्याने WWE मध्ये सध्या दु:खाचे वातावरण आहे. निकोलाई वोलकॉफ या ७० वर्षीय पहिलवानाला गेल्या काही दिवसांपासून डीहायड्रेशनसह अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या होत्या. काही दिवसांपूर्वीच उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. घरी आणल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा त्रास सुरू झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ब्रायन क्रिस्टोफरदादा द किंग लॉलर याचा मुलगा ब्रायन याचाही मृत्यू झाला आहे. ब्रायनचा मृत्यू कोणत्या रोगामुळे नाही तर आत्महत्या केल्यामुळे झाला. ब्रिकहाऊस ब्राऊन याचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला. ब्रिकहाऊसने १९८० च्या दशकात कुस्तीमध्ये पदार्पण केले होते आणि विन्स मॅरमॅहनचा तो खास होता.तीन पहिलवानांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने कुस्तीपटूंनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केले आहे.