गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020 (16:15 IST)

नुकतेच जन्मलेले बाळांचे पण आधार कार्ड बनू शकते

आज आधार कार्ड एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी लागत असत. शाळेत नाव दाखल करायला आधार कार्ड मागितले जाते. पण बऱ्याच लोकांना ह्या बद्दलची माहिती नसते की आधार कार्ड कोठून बनवायचे आणि त्यासाठी कुठली कागदपत्री लागतात. मग जाणून घेऊ या ....

त्वरित बनते आधार कार्ड :

बाळाचे वय 5 वर्ष पेक्षा कमी असल्यास :
5 वर्ष खालील वयोगटाच्या मुलांच्या नांवाचे फार्म आधार कार्ड पंजीकरण केंद्रात जाऊन भरावे लागतील. या फार्म सोबत त्याच्या जन्माचे प्रमाण पत्र आणि स्वतःचे आधार कार्डाची छायाप्रत द्यायची असते. बाळाचे आधार कार्ड बनविण्यासाठी स्वतःचे मूळ आधारकार्ड सोबत ठेवणे. 
 
वयोगट 5 वर्षाच्या खालील बाळांचे बायोमेट्रिक परीक्षण होत नसते. म्हणजे रेटीना स्कॅन आणि बोटांचे ठसे घेतले जात नसून फक्त बाळाचे फोटो लागतात. 
 
बाळाचे आधार कार्ड त्याच्या आई, वडिलांच्या आधार कार्डाशी संलग्न केले जाते. पण 5 वर्षाच्या झाल्यावर बाळाच्या 10ही बोटांचे ठसे घेतले जातात, तसेच रेटीना स्कॅन केले जाते आणि बाळाचे फोटो द्यावे लागते.
 
बाळाचे वय 5 वर्ष पेक्षा अधिक असल्यास :
5 वर्षाच्या वयोगटातील अधिक मुलं असल्यास त्याचं आधार कार्ड बनवायला पंजीकरण सोबत त्यांचा जन्माचे प्रमाणपत्र आणि शाळा दाखल्याची प्रत द्यावी लागते. 
 
मुलाचे शाळेत दाखले झाले नसल्यास आई-वडिलांच्या आधार कार्डाची छाया प्रत द्यावी लागते.ही छायाप्रत राजपत्रीय अधिकारी (गजेटेड ऑफिसर) किंवा तहसीलदाराने अधिकृत सत्यापित केलेले असावे.
 
पत्त्याचा पुरावा (ऍड्रेस प्रूफ ) साठी राजपत्रीय अधिकारी, क्षेत्राचे तहसीलदाराने किंवा ग्रामपंचायत ने अधिकृत सत्यापित केलेली फोटोसह प्रमाण पत्र द्यावे लागणार तेच मान्य मानले जाते. 
 
त्या शिवाय मुलांच्या हातांच्या बोटांचे ठसे त्याची फोटो आणि जन्माचे प्रमाण पत्र, रेटिना स्कॅन द्यावे लागते.
 
मुलाचे वयोगट 15 वर्षाच्या अधिक असल्यास त्याला बायोमेट्रिक परीक्षण करावे लागते.   
 
0 - 5 वयोगटातील मुलांना निळ्या रंगाचे आधार कार्ड दिले जातात.