शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 29 जानेवारी 2024 (17:34 IST)

निरोगी राहण्यासाठी मेडिटेशन(ध्यान) करा तसेच फायदे जाणून घ्या

meditation
मेडिटेशन मेंदूला निरोगी बनवते आणि मानसिक त्रासाला दूर करण्यासाठी एक चांगला उपाय आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात मेंटल हेल्थ जास्त प्रभावित होते. अशामध्ये रोज पाच मिनिट मेडिटेशन केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. यामुळे तुमचा मूड छान होईल आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल. मेडिटेशन केल्याने तुम्हाला नेहमी सकारात्मक ऊर्जा जाणवेल आणि तुम्ही नेहमी खुश रहाल. मेडिटेशन केल्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तसेच तुम्हाला चांगली झोप यायला मदत होते. 
 
मेडिटेशन एक ध्यान लावण्याची प्रक्रिया आहे. यात तुम्ही शांत जागी बसून लांब, दीर्घ श्वास घेतात. यावेळी तुम्हाला पूर्ण तुमचे लक्ष श्वासावर केंद्रित करायचे आहे. या प्रकारे तणाव पासून पण मुक्ती मिळते. 
 
मेडिटेशन कसे करावे- 
तुम्हाला मेडिटेशन करण्यासाठी शांत जागेची निवड करायची आहे. आवाज असणाऱ्या जागेवर तुम्हाला समस्या येईल. तुम्ही एखादया खुर्चीवर किंवा जमिनीवर बसून पण ध्यान लावू शकतात. यादरम्यान तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. 
 
गजर लावणे-
वेळेचे अंदाज लावण्यासाठी तुम्हाला वेळ सेट करावी लागेल. यामुळे तुम्हाला सारखे घड्याळ पाहावे लागणार नाही. आणि तुम्ही अडचण न येता मेडिटेट करू शकाल. 
 
श्वासावर ध्यान केंद्रित करणे-
मेडिटेशन करण्यासाठी सर्वात आधी आपले डोळे बंद करणे यावेळी आपल्याला बाहेरील आवाजावर लक्ष न देता आपल्या श्वासवर फोकस करायचा आहे. तसेच मोठा आणि दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्या श्वासावर ध्यान लावून मोजायचे श्वास घेणे आणि सोडणे याला मोजणे. 
 
मंत्राची निवड- 
तुम्ही मेडिटेशन करीता एखादा मंत्र निवडाल तर तुम्हाला खूप सोयीचे जाईल. तुम्ही या मंत्राला प्रत्येक श्वासासोबत मोजू शकतात. तसेच ॐ चा जप पण करू शकतात. यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल.  
 
मेंदु शांत ठेवणे- 
मेडिटेशनचा अभ्यास करतांना मनात कुठलेच विचार आणू नये. यामुळे तुमचे ध्यान भटकेल यासाठी मेंदूला शांत ठेवणे. 
 
ध्यान विचलित होवू नका देवू- 
मेडिटेशनच्या वेळेस तुमचे ध्यान विचलित होवू द्यायचे नाही. कुठलीपण हालचाल किंवा आवाज जाणवतो आहे तेव्हा तुम्हाला लक्ष केंद्रित ठेवायचे आहे. मेडिटेशनला संपवायची गर्दी करायची नाही. गजर वाजताच डोळे उघडायची घाई करू नये गजर बंद होताच थोडे थांबणे तुमच्या हातांना एकमेकांवर घासा व डोळ्यांवर लावा. सोबतच धीरे धीरे डोळे उघड़ा.
 
मेडिटेशनचे फायदे- 
यामुळे स्ट्रेस पासून आराम मिळतो. 
डोक्याला शांत ठेवते. 
सकारात्मक ऊर्जा मिळते. 
मेंदु आरोग्यदायी बनतो.