Akshaya Tritiya Puja Vidhi : अक्षय तृतीयेला घरात सोप्या पद्धतीने करा पूजा

Akshaya Tritiya
Last Updated: शुक्रवार, 14 मे 2021 (08:48 IST)
अक्षय तृतीया सर्वात सिद्ध मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी भाविक भगवान विष्णूंची पूजा करतात.‍ स्त्रिया आपल्या आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी उपवास करतात. या दिवशी काही सोप्या पद्धतीने पूजा करुन देवाला प्रसन्न केले पाहिजे.
या दिवशी ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून स्नानादि करुन श्री विष्णू आणि माँ लक्ष्मीच्या मूर्तीवर अक्षता अर्पित कराव्या. शांत मनाने पांढर्‍या कमळाची फुले किंवा पांढरे गुलाब, धूप-उदबत्ती, आणि चंदन इत्यादी सामुग्रीने पूजा करावी. गहू किंवा सत्तू, काकडी, हरभरा, याचं नैवेद्य दाखवावं. या दिवशी ब्राह्मणांना अन्न दान करुन त्यांचा आशीर्वाद प्राप्त करावं. तसेच या ‍दिवशी फळं, भांडी, कपडे, गाय, जमीन, पाण्याने भरलेले घडे, पंखे, तांदूळ, मीठ, तूप, खरबूज, साखर, हिरव्या भाज्या इत्यादी दान करणे चांगले मानले जाते.
या दिवशी विष्णू सहस्रनामाचा जप करावा. सर्वात शेवटी तुळशीला जल ‍अर्पित करावे आणि श्रद्धापूर्वक आरती करावी. मातीच्या लहान मटक्यात पाणी भरून ठेवावे त्यावर खरबूज ठेवावे आणि पूजा केल्यानंतर सवाष्णीला याचे दान द्यावे.

या व्यतिरिक्त या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी शुभ संयोग आहे त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथी दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात. या दिवशी देव, ऋषी, पितरांसाठी ब्रह्म यज्ञ, पिंड दान आणि अन्न दान करावे. या दिवशी पाण्याच मटके दान करावे. तसेच या तिथीला जव, गहू, सातू, तांदूळ, मातीचे मडके, फळ दान करणे शुभ ठरेल. या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.
अक्षयतृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुण्य मिळते. याने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो.

अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. या मुहूर्तावर रोवल्यास वनस्पतींचा क्षय होत नाही.
स्त्रियांसाठी अक्षय तृतीया हा दिवस महत्त्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी त्यांना विसर्जन करायचे असते. त्यानिमित्त त्या हळदीकुंकूही करतात.
दान व्यतिरिक्त या दिवशी स्वत:साठी खरेदी करुन त्याची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमी साथ देतं. म्हणून या दिवशी लोक जमीन, जायदादसंबंधी किंवा शेअर मार्केट संबंधी तसेच रीअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करणे यात विश्वास ठेवतात. अनेक लोक या दिवशी गृह प्रवेश, तसेच मंगळ कार्य करणे शुभ

समजात. या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ ठरतं कारण या दिवशी केलेल्या कामात बरकत येते. म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे. दान-पुण्य करावे कारण ज्या प्रकारे चांगल्या कामाचे चांगले परिणाम तसेच वाईट कामाचे वाईट परिणाम मिळतात. म्हणून या दिवशी जरा सांभाळून वागावे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

गंगा दशहरा महात्म्य, पूजा विधी

गंगा दशहरा महात्म्य, पूजा विधी
गंगा दशहरा हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. या दिवशी आई गंगा पृथ्वीवर आली, ज्येष्ठ शुक्ल ...

Nirjala Ekadashi 2021 : निर्जला एकादशीला करा कामधेनुची ...

Nirjala Ekadashi 2021 : निर्जला एकादशीला करा कामधेनुची पूजा, शुभ फल प्राप्त होतील
दरवर्षी ज्येष्ठ शुक्ल एकादशीला 'निर्जला एकादशी' व्रत पाळला जातो. यावर्षी हा व्रत 21 जून ...

गंगा दसर्‍याच्या दिवशी फक्त एक उपाय करा, आपले घर संपत्तीने ...

गंगा दसर्‍याच्या दिवशी फक्त एक उपाय करा, आपले घर संपत्तीने भरेल
गंगा दशहरा हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे जो जेष्ठ शुक्ल दशमीला साजरा केला जातो. या दिवशी ...

मंत्रात शक्ती असते का ?

मंत्रात शक्ती असते का ?
बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो खरच मंत्रात शक्ती आहे का? याचं हे साधं उदाहरण... कुणी ...

Masik Durga Ashtami Vrat 2021 : मासिक दुर्गाष्टमी आज, ...

Masik Durga Ashtami Vrat 2021 : मासिक दुर्गाष्टमी आज, पूजेची पद्धत, त्याचे महत्त्व, शुभ वेळ आणि घटकांची संपूर्ण यादी जाणून घ्या
हिंदू कॅलेंडरनुसार मासिक दुर्गाष्टमीचा व्रत दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला ...

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...