बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. बजेट 2010
Written By वेबदुनिया|

माजी अर्थमंत्र्यांच्या भाषणांचा सारांश

हा अर्थसंकल्प सादर करताना मला, मी स्वतः:ला एक अत्यंत थकलेल्या तीर्थयात्रेकरूच्या भूमिकेत पाहात आहे. मला असे वाटते की, जसा जसा मी पुढे जात आहे, तसे तसे मला उंचच उंच पर्वत दिसत असल्याचे जाणवत आहे. -आर. के. षणमुगम चेट्टी
(1948-49 चा अर्थसंकल्प सादर करताना)

तोटा आणि अतिरिक्त करांचा प्रस्ताव संसदेत मांडताना मला फारसा आनंद होतो असे नाही. परंतु, एका अर्थमंत्र्याला हे करावेच लागते. याला पर्याय असत नाही. मला नेहमीच असे वाटते, की अर्थसंकल्पात देशभरातील नागरिकांच्या भावना गुंतलेल्या असतात, यातून त्यांना काही अपेक्षा असते म्हणून हा मानवी दस्तावेज असल्याचे माझे मत आहे -जॉन मथाई
(1949-50 व 50-51 चा अर्थसंकल्प सादर करताना)

आपले यशापयश हे आपल्याच कर्मावर अवलंबून असते, असे प्रत्येकाचे ठाम मत असायला हवे. आपली शक्ती, आपला विवेक, आपली एकता, आणि परस्पर सहकार्य हे त्या लोकांवर अवलंबून असते, ज्यांची सेवा आपण करतो. -जवाहरलाल नेहरू
(58-59 चा अर्थसंकल्प सादर करताना)

आपण आत्ताचा काही विकास करण्याचा निर्णय घेत असू, तर पुढील काळात निर्माण होणार्‍या विकासाच्या सार्‍या संधी आपण गमावून बसू. विकास होणे ही काळाची गरज असेल तर सामाजिक कल्याण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्थेला उत्पन्न, खर्च, संपत्ती या सार्‍या गरजांना उपलब्ध साधनांच्या माध्यमातून पूर्ण करणे गरजेचे आहे. -इंदिरा गांधी
(70-71 चा अर्थसंकल्प सादर करताना)