1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मार्च 2020 (13:14 IST)

कोरोनाला पळवण्यासाठी इटलीमध्ये फुटबॉल मैदान बनले हॉस्पिटल

इटलीमध्ये सध्या करोना व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलची जागाही अपुरी पडू शकते. त्यामुळे आता इटलीच्या राष्ट्रीय संघटनेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. करोना व्हारसने बाधित असलेल्यांवर उपचार करण्यासाठी त्यांनी आता आपले राष्ट्रीय मैदान सरकारसाठीउपलब्ध करून दिले आहे.

फुटबॉलमध्ये इटली या देशाला मानाचे स्थान आहे. त्यामुळे इटलीची राष्ट्रीय   अकादमीही चांगलीच मोठी आहे. त्यामुळे आता करोना बाधितांच्या उपचारांसाठी इटलीचे राष्ट्रीय फुटबॉल सेंटर सरकारला वापरण्यासाठी देण्यात  येणार आहे.

गरज पडल्यास आम्ही देशातील सर्व मैदाने देशासाठी देऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे. याबाबत इटालिन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष गॅब्रिल ग्रॅव्हिना म्हणाले की, माणसांचा जीव हा सर्वात महत्वाचा आहे आणि त्याची   काळजी घेतली गेलीच पाहिजे.