मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: तुळजापूर , रविवार, 24 मे 2020 (07:17 IST)

बाहेर गावाहुन येणाऱ्या लोकांपासून तिर्थक्षेञ तुळजापूरला धोका वाढण्याची शक्यता

corona
तिर्थक्षेञ तुळजापूरातील एकाही नागरिकाला आजपर्यत कोरोना संसर्गजन्य रोगाची लागण झाली नाही माञ बाहेर गावाहुन येणाऱ्या मंडळीमुळे तुळजापूरच्या नागरिकांना कोरोनाचा धोका असल्याची चर्चा आहे. यासाठी बाहेर गावाहुन येणाऱ्या मंडळीवर प्रशासनाने डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवुन दक्ष राहणे गरजेचे बनले आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूरात 10एप्रिल ते 20मे या कालावधीत 327मंडळी आले आहेत. तिर्थक्षेञ तुळजापूरात पुणे रिर्टन विवाहीत महिलेमुळे तुळजापूरात कोरोना शिरकाव होणार असे वाटत असताना त्या महिलेच्या संपर्कात आलेले तिचे आई वडील भाऊ बहीण तिला गाडीतुन आणणाऱ्या चालकाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना शिरकाव थांबला.

त्यामुळे शहरवासिय, लोकप्रतिनिधी,पोलिस,आरोग्य खात्यातील मंडळी यांना आता अधिक जागरुक राहणे गरजेचे बनले आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे पुणे रिर्टन रुग्ण सोलापूरहुन तामलवाडी आला कि अन्य चोरट्या रस्ता मार्गाने तुळजापूरात आला याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे बनले आहे.

काही चालक अर्थिक लोभापोटी विना परवाना शहरी भागातुन मंडळीना तुळजापूरात आणल्याची चर्चा आहे.त्यामुळे तामलवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील लांबोटी दहीवडी मसला मार्गावरही पोलिसांनी करडी नजर ठेवणे गरजेचे बनले आहेशहरी भागातुन आलेले होम क्वारटांईन केलेल्या मंडळी वर लक्षठेवणे गरजेचे बनले आहे.