बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Updated : सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (15:40 IST)

गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपतीला पाण्यातच विसर्जन का करतात, जाणून घेऊ या..

गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटा माटाने साजरा केला जातो. या दिवशी सर्व आपापल्या घरातच आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करतात. अश्या परिस्थितीत आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल की गणेश चतुर्थी नंतर हा उत्सव 10 दिवस साजरा करण्यात येतो आणि त्यानंतर गणेशाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी पाण्यात विसर्जित केले जाते. इथे आपणांस सांगू इच्छितो आहोत की यंदा बाप्पांना विसर्जित करण्याचा दिवस अनंत चतुर्दशी 1 सप्टेंबर रोजी आहे. तर जाणून घेऊ की बाप्पाला  पाण्यातच विसर्जित का करतात. होय, त्यामागे एक पौराणिक कथा आहे, तीच आज आम्ही आपणांस सांगणार आहोत..

जेव्हा ऋषी वेदव्यासजींनी संपूर्ण महाभारत बघून आपल्यात आत्मसात केले, पण ते काही लिहू शकत नव्हते. म्हणून त्यांना अशाची गरज होती जे न थांबता संपूर्ण महाभारत लिहू शकेल. मग त्यांनी ब्रह्माजींना विनवणी केली. ब्रह्माजीने त्यांना सांगितले की गणपती बुद्धीचे दैवत आहे ते आपणांस नक्कीच मदत करतील. मग त्यांनी गणेशाला महाभारत लिहिण्याची विनवणी केली. गणपती बाप्पाला लेखनात कौशल्य आहे, त्यांनी महाभारत लिहिण्यास होकार दिला. ऋषी वेदव्यासाने चतुर्थीच्या दिवसापासून अखंड दहा दिवसापर्यंत महाभारताचे संपूर्ण वर्णन गणेशाला ऐकवले ज्याला गणपतीने तंतोतंत संपूर्ण लिहिले.
महाभारत पूर्ण झाल्यावर वेदव्यासजींनी डोळे उघडल्यावर बघितले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप जास्त झाले असे. त्यांचा शरीराच्या तापमानाला कमी करण्यासाठी वेदव्यासजीने गणेशाच्या शरीराला मातीचा लेप लावला, माती सुकल्यावर त्यांचे शरीर ताठरले आणि माती पडू लागली मग महर्षी वेदव्यासांनी गणेशाला तलावात नेऊन मातीचे लेप स्वच्छ केले. कथेनुसार जडीवाशी गणेशाने महाभारत लिहिण्यास सुरुवात केली तो दिवस भाद्रपदातील शुक्ल पक्षाची चतुर्थीचा असे, आणि ज्या दिवशी महाभारताची सांगता झाली तो दिवस अनंत चतुर्दशीचा असे. तेव्हा पासून दहा दिवस गणपतीची स्थापना करण्यात येते आणि 11 व्या दिवशी गणेश उत्सवानंतर बाप्पाचे विसर्जन केले जाते.