गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By वेबदुनिया|

मावा मोदक

साहित्य : अर्धा किलो ताजा खवा, दीड वाटी पिठीसाखर, दोन-तीन थेंब पिवळा लिक्वीड फूड कलर, वेलची-जायफळाची पूड.

कृती : खवा मंद आचेवर रंग न बदलू देता भाजावा. त्यात पिठीसाखर मिसळावी. मिश्रण पातळ झाल्यावर इतर साहित्य मिसळून ते आळेपर्यंत शिजवावं आणि उतरवून गार होऊ द्यावं. छोट्या मोदकांच्या साच्यात तळाकडून थोडं थोडं मिश्रण दाबून भरून मोदक तयार करावेत आणि ताटात मांडून सुकू द्यावेत.