नागपूरचा टेकडीवरचा वरदविनायक

- नितिन फलटणकर

nagpur tekdi ganapati
वेबदुनिया|
नागपूर ऐतिहासिक नगरी आहे. या नगरीत अनेक ऐतिहासिक स्मारके आहेतच शिवाय अत्यंत प्राचीन आणि पुरातन मंदिरंही या नगरीत आपल्याला पाहायला मिळतील. नागपूरचा इतिहास पाहता इथे ताम्राश्य संस्कृती होती. नागसंस्कृतीचा उल्लेखही नागपूरच्या इतिहासात आढळतो. येथील संस्कृतीत अनेक देवी देवतांचे उल्लेख आपल्याला आढळून येतात. गजाननाला नागपुरात नागानन या नावाने संबोधण्याची प्रथा प्राचीन आहे. त्यामुळे गजाननाची आराधना करणाऱ्या नागपूरकरांना गणपती अत्यंत प्रिय आहे.
नागपूरचा प्राचीन इतिहास पाहता येथे गवळ्यांच्या बारा टोळ्या होत्या, यात सीताबर्डी ही अत्यंत सधन अशी टोळी मानली जाते. या टेकडीवर शिवमंदिर आणि गणेश मंदिर होते असा पुरातन उल्लेखही आढळतो. हे मंदिर आजही अस्तित्वात असून, अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे.

येथे रेल्वे स्टेशनच्या कामासाठी 1866 साली खोदकाम करण्यात येत असताना गणपतीची शेंदूर लावलेली मूर्ती सापडली. हीच ती आजच्या टेकडी गणपतीची मूर्ती. नागपूरातील प्रसिद्ध असलेल्या सर्व गणेशांचा आद्य श्रद्धेचा मान टेकडीवरील गणपतीला दिला जातो. जसा मुंबईकरांना सिद्धीविनायक तसाच नागपूरकरांना टेकडीवरील वरदविनायक मानला जातो.

मंदिराची जागा बरीच मोठी असून येथे इतरही अनेक मंदिरे आहेत, यात गणेश मूर्तीच्या पाठीमागे डाव्या हाताला भैरवाची पाषाण मूर्ती आहे. हा काळभैरव अत्यंत जागृत आणि जगाचा पालनकर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. देवालयाच्या मागील बाजूस काळ्या पाषाणाची महादेवाची पिंड आहे. काळभैरवाची मूर्ती आणि ही पिंड एकाच दगडाच्या बनलेल्या असून नंदीच्या पाठीवर असलेली ही नंदीच्या पाठीवरची ही पिंड दुर्मिळ आहे.

महादेवाजवळच डावीकडे गणेशाची दगडी मूर्ती आहे. 1970 च्या सुमारास या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापण करण्यात आली. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला ऋद्धी सिद्धी आहेत. गणेश मंदिरातच श्री राधाकृष्णाचे मंदिरही आहे. गणेशाच्या उजव्या बाजूला हनुमान मंदिर आहे. ही मूर्ती अत्यंत रेखीव असली तरी शेंदूर लेपनाने तिचा रेखीवपणा फारसा दिसून येत नाही. मंदिरासमोरच महालक्ष्मी मंदिर आहे.

मंदिरात गणेश जयंतीच्या दिवशी गणेश यागाचे आयोजन करण्यात येते. सध्या देवस्थानात येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून विदर्भातील सर्वांत श्रीमंत गणपती अशी या देवस्थानाची ओळख होत आहे. देवस्थान इतके प्राचीन आणि जागृत आहे की, आपण याला एकदा अवश्य भेट द्यावी.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्रीरामाची एकमेव चतुर्भुजी मूर्ती, जाणून घ्या रोचक माहिती

श्रीरामाची एकमेव चतुर्भुजी मूर्ती, जाणून घ्या रोचक माहिती
मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मांडू (मांडव) म्हणून ठिकाण आहे. हे ठिकाण नैसर्गिक ...

Ram Navami 2020 : श्रीरामापेक्षा राम या नावाचं अधिक ...

Ram Navami 2020 : श्रीरामापेक्षा राम या नावाचं अधिक महत्त्व, जाणून घ्या यामागील गूढ
'राम' केवळ एक नाव नव्हे, केवळ एक मानव नव्हे. राम परम शक्ती आहे. प्रभू श्रीरामाला विद्रोह ...

राम नवमी विशेष : रावणाने सांगितले होते स्त्रियांचे 8 अवगुण, ...

राम नवमी विशेष : रावणाने सांगितले होते स्त्रियांचे 8 अवगुण, जाणून घेऊ या.....
महर्षी वाल्मीकीची रामायण 3 मुख्य घटनांच्या ओवती-भोवती फिरते. 1 रामाच्या वनवासाची कैकेयी ...

कैसे करू ध्यान....

कैसे करू ध्यान....
वरवर पाहता आपण तीर्थयात्रा करत असू, ध्यान, पूजाअर्चा करत असू. बरेचदा स्वतःच्या बदलासाठी, ...

Ram Navami 2020: प्रभू श्रीरामाचे हे 11 गुण जाणून जीवनात ...

Ram Navami 2020: प्रभू श्रीरामाचे हे 11 गुण जाणून जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा
प्रभू श्रीराम यांच्या स्वभावातील हे 11 गुण जाणून घ्या ज्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...