मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By वेबदुनिया|

मोरया गोसावी मंदिर

चिंचवड रेल्वे स्थानकापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर मोरया गोसावी मंगलमूर्तीचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनीच या उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना केली आहे.

पिंपरी- चिंचवड परिसरातील हे एक जागृत गणेशस्थान आहे. १६ व्या शतकात मोरया गोसावी यांनी येथे जिवंत समाधी घेतली. त्यानंतर त्यांच्या मुलाने येथे मंदिर स्थापले. मोरया गोसावी मंदिराचे विशेष सांगायचे झाल्यास समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज हे येथे नियमित येत असत.