रविवार, 22 सप्टेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By

महाराष्ट्राचे १० प्रमुख संत ज्यांनी गुरु म्हणून खूप काही शिकवले

gyaneshwar
Popular Saints of Maharashtra धर्म आणि संस्कृती, ह्यांचा अद्भुत समावेश ठेवत असणार्‍या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीने खूप दिग्गज संतांना जन्म दिले आहे आणि त्यामुळे ही "संतांची भूमी" म्हणून पण जाणली जाते. ह्या भूमीवर अनेक संत हुन गेले ज्याची यादी खूप मोठी आहे.
 
भक्ती चळवळी आणि वारकरी सभ्यतेने खूप संतांना जन्म दिलं आहे. ह्या संत जणांनी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शिकवणी देऊन लोकांना जागरूक केलं आहे.
चला जाणून घेऊ या १० अशाच संतांबद्द्ल :-
 
1. संत ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर महाराज मराठी संत आणि कवी होते. हे वारकरी परंपरांचे संस्थापकांपैकी एक आहे, वारकरी संप्रदायात कोणीही येऊन ईश्वरप्राप्ती करू शकतो हा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले होते. ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका, अमृतानुभव किंवा अनुभवामृत, चांगदेवपासष्टी हे यांची प्रमुख रचना आहे.
 
2. संत तुकाराम
संत तुकराम यांनी वारी ही परंपरा संत ज्ञानेश्वर महाराजांसह सुरु केली होती. मनुष्याचे भाव, जीवन अनुभव आणि आध्यात्मबद्दल असणार्‍या "तुकाराम गाथा" किंवा "अभंग गाथा" ज्याच्यात ४५०० जितके अभंग आहेत, खूप प्रचलित आहे.
 
3. संत चोखामेळा
महार जातीचे संत चोखामेळा खूप मोठे संत होऊन गेले, महाराष्ट्रातील जितके संत होऊन गेले त्यांच्याबद्दल एक ठरलेली जात हा प्रकारच कधीच नव्हता. यांचे अभंग "अबीर-गुलाल उधळीत रंग..." आज ही पांडुरंगाची भक्ती करणार्‍या लोकांच्या ओठांवर आहे.
 
4. संत सोयराबाई    
१४व्या शतकातील मराठी कवयित्री संत सोयराबाई संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. सोयराबाईंना असा विश्वास होता की "केवळ शरीर अपवित्र किंवा दूषित असू शकते परंतु आत्मा कधीही अशुद्ध नसतो. ज्ञान हे शुद्धच असते.
 
5. संत एकनाथ
देशस्थ ऋगवेदी ब्राह्मण कुटुंबात जन्मले एकनाथ महाराजांचे मत होते की "देवाच्या दृष्टित सगळे सामान असतात, ब्राह्मण असो किंवा इतर कोणत्याही जातीचा, हिंदू असो किंवा मुस्लिम". 'एकनाथी भागवत',' भावार्थ रामायण' ,'शुकाष्टक' ह्या संत एकनाथ महाराजांच्या रचना आहेत. ह्यांनी 'भारूड' नावाने एक वेगळा प्रकाराचे भक्तीगीत सुरु केले होते आणि जवळ-जवळ ३०० भारूड लिहिले.
 
6. श्री स्वामी समर्थ 
अक्कलकोटचे स्वामी समर्थ दत्तात्रेय परंपरेचे आध्यात्मिक गुरु होते. श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेय यांचा चौथा (शारीरिक स्वरुपातील तिसरा) अवतार मानले जातात. ते नरसिंह सरस्वतीचे (दत्तात्रेय संप्रदायाचे आणखीन एक पूर्वीचे आध्यात्मिक गुरु) पुनर्जन्म ही मानले जातात.
 
7. गजानन महाराज 
गजानन महाराज हे दत्तात्रेय संप्रदायाचे गुरू होते. त्यांनी ‘भक्ती मार्गाने देवा पर्यंत पोहचता येते’ हा संदेश दिला. २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ३० वर्षाचे गजानन महाराज शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले होते आणि हा दिवस महाराजांच्या प्रकटदिनाच्या निमित्ताने शेगाव येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव होतो.
 
8. गोंदवलेकर महाराज
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे मूळ नाव गणेश रावजी घुगरदरे होते. गोंदवलेकर महाराजांनी हजारों भाविकांना रामभक्तीला लावले आणि अनेक ठिकाणी रामाची देवळे उभारून उपासनेची केंद्रे निर्माण केली.
 
9. श्री साईबाबा  
शिर्डीचे साई बाबांचा जन्म, आई-वडील आणि जातीबद्दल कोणालाही काहीही माहिती नाही. असे म्हटले जाते की बाबा पहिल्यांदा वयाच्या सोळाव्या वर्षी शिर्डीत लिंबाच्या झाडाखाली दिसले होते. ते 'अल्लाह मालिक' किंवा 'सबका मालिक एक' असे म्हणायचे. त्यांनी सर्व धर्मांच्या एकतेवर लक्ष दिले आणि ते वेग-वेगळ्या धर्माच्या लोकांना त्यांचे आश्रयस्थल द्वारकामाई येथे आश्रय देत असे. त्यांचे अनुयायी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही होते.
 
10. संत जनाबाई
संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून लोकप्रिय आहेत.ज नाबाई प्रसिद्ध मराठी धार्मिक कवी नामदेव ह्यांचा घरात दासी म्हणून काम करत होत्या. त्यांनी अनेक अभंगांची रचना केली आहे जवळ-जवळ ३०० अभंग. वारकरी परंपरेचे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांच्याबरोबरच मराठी भाषी लोकांच्या मनात जनाबाईंना आदराचे स्थान आहे.
 
या सोबतच समर्थ रामदास स्वामी, संत नामदेव, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत नरहरी सोनार, संत निवृत्तीनाथ, संत मीराबाई, संत मुक्ताई, संत सावता माळी, भक्त गोमा बाई, संत बंक महार, संत भागू, संत दामाजी पंत, संत कान्होपात्रा, संत निर्मला, संत सेने न्हावी यासारख्या अनेक संतांचे जन्मस्थळ आणि कर्मस्थळ असणारा महाराष्ट्र संतांची भूमी म्हणूनच ओळखला जातो.