बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

हे 14 संकेत मिळतात मृत्यू अगोदर, शास्त्रांमध्ये देखील आहे उल्लेख

मृत्यू एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला एका न एक दिवस येणारच आहे. जीवन आहे तर मृत्यूही निश्चित आहे पण तुम्हाला  माहीत आहे की मृत्यू अगोदर मनुष्याला काही संकेत मिळतात. हिंदू धर्मात प्राचीन अध्ययनानुसार मरण्याअगोदर काही संकेत मिळतात. हिंदू विद्वानांनी ब्रह्मांड आणि कल्की पुराणात मृत्यू अगोदर मिळणार्‍या संकेतांबद्दल सांगितले आहे. तर जाणून घेऊ त्या संकेतांबद्दल...  
 
शारीरिक संकेत 
- जर त्वचेचा रंग पिवळा, लाल किंवा पांढरा पडला असेल तर याचा अर्थ आहे व्यक्तीचा मृत्यू 6 महिन्यात होणार आहे.  
- एखाद्या व्यक्तीमधून मेलेल्या माणसासारखी दुर्गंध येऊ लागेल तर समजा त्या माणसाचा मृत्यू पुढील 15 दिवसांमध्ये शक्य आहे.   
- एखाद्या व्यक्तीचा डावा हात सात दिवसांपर्यंत हालत राहत असेल तर त्याचा मृत्यू पुढील एक महिन्यात होण्याची शक्यता आहे.  
- मूत्र करताना सारखी उचकी येणे आणि अन्नात कुठल्याही प्रकारचा स्वाद किंवा गंध न येणे देखील लवकर मृत्यूचे संकेत आहे. 
- जर माणसाचे शरीर दगडासारखे कठोर झाले तर त्याची मृत्यू लवकरच होईल अशी शक्यता असते.
- जेव्हा बाहेरून जोराने येत असलेले आवाज येणे बंद होतील तरी देखील व्यक्तीचा मृत्यू जवळ आहे.   
- जर कोणी आपल्या आतील कानाची आवाज ऐकू शकत नसेल तर त्याचा मृत्यू 1 वर्षात होण्याची शक्यता आहे.  
- जीभ भारी झाली किंवा दातांवर चिकने पदार्थांची परत चढली तर तुमचा मृत्यू पुढील 6 महिन्यात होण्याची शक्यता आहे.  
- डाव्या डोळ्यातून बीना कारण अश्रू निघत असतील किंवा कपाळावर घाम येण्याचे संकेत आहे की तुमचा मृत्यू लवकरच होणार आहे.  
 
स्वप्नात देखील मिळतात हे संकेत  
- स्वप्नात स्वत:ला सोनं किंवा चांदीची उलटी करताना बघायचे म्हणजे तुमचा मृत्यू पुढील 10 दिवसांमध्ये होऊ शकतो.  
- जर स्वप्नात घाण पाय दिसले तर तुमचा मृत्यू 10 महिन्यात होऊ शकतो.  
- स्वप्नात बहिरा, काळ्या रंगाचे वस्त्र घातलेला किंवा कोळश्यात स्वत:ला मानेपर्यंत दफन बघितले तर तुमचा मृत्यू निकट आहे.  
- उंचीवरून स्वत:ला पडताना दिसणे, नग्न अवस्थेत किंवा रेगिस्‍तानमध्ये प्रवास करण्याचा अर्थ असा आहे तुमचा मृत्यू 3 महिन्यात होऊ शकतो.  
- आपल्या जवळपास मृत व्यक्तींना बघण्याचे संकेत आहे की वर्षभरात तुमच्या मृत्यूचे योग आहे.