1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (08:53 IST)

अंगारकी चतुर्थी उपाय : गणपती बाप्पा प्रत्येक संकट दूर करेल

लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी
जर तुमच्या घरात कोणाचे लग्न होण्यात अडथळे येत असतील, कोणत्याही प्रकारची विघ्न येत असेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला गूळ आणि दुर्वाच्या 21 जुडी अर्पण करा आणि प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करा. यामुळे लग्नात येणारे सर्व अडथळे हळूहळू दूर होतील.
 
आर्थिक समस्या सोडवण्यासाठी
घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गूळ अर्पण करा. जर तूप गायीचे असेल तर ते अधिक चांगले आहे. या नैवेद्याचं गूळ गायीला खाऊ घाला. हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आणि पुढील वर्षी अनंत चतुर्दशीपर्यंत करा. काही काळातच तुम्हाला घरात गणपतीचा आशीर्वाद दिसू लागेल.
 
घरात शांततेसाठी
असे म्हणतात की ज्या घरात संकटे असतात, तिथे माता लक्ष्मीचा वास कधीच नसतो. घरामध्ये देवी लक्ष्मीला बोलावायचे असेल तर शांती आणि आनंद राखणे खूप महत्वाचे आहे. यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात गणेश यंत्राची स्थापना करा. हे यंत्र खूप लाभदायक आणि शुभ आहे. या यंत्राची प्रतिष्ठापना केल्याने घरात सुख-शांती राहते आणि नकारात्मकता दूर होते.
 
प्रगतीसाठी
जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल किंवा नोकरीमध्ये पदोन्नती हवी असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची बाप्पाची मूर्ती घरी आणा, त्याची पूजा करा आणि हळदीच्या पाच गाठी अर्पण करा. या दरम्यान 'श्री गणाधिपतये नम:’या मंत्राचा जप करावा.
 
कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठी
तुमच्या कुटुंबात काही संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला. गणपती गजमुख आहे. असे केल्याने बाप्पा खूप प्रसन्न होतो आणि भक्ताचे सर्व संकट दूर करतो.