बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 23 डिसेंबर 2023 (09:19 IST)

Bhagwat Ekadashi 2023: भागवत एकादशीच्या व्रताचे महत्त्व जाणून घ्या

Papankusha ekadashi
Bhagwat Ekadashi 2023: भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशी व्रत केले जाते. वारकरी संप्रादयामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. या दिवशी विष्णु भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो.
 
एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो.
 
याशिवाय कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्‌तिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. पौराणिक कथेनुसार,  एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात.
 
Edited by - Priya Dixit