बुधवार, 23 एप्रिल 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 15 एप्रिल 2025 (10:09 IST)

मुलांचे कपडे रात्री बाहेर का वाळवू नयेत? वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे जाणून घ्या

clothes outside at night
अनुभवी आणि वयस्कर लोक सांगतात की,लहान मुलांचे कपडे रात्री बाहेर का वाळवू नयेत? ही केवळ एक परंपरा नाही तर त्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे आहे. तर चला जाणून घेऊ या....

वास्तु, विज्ञान आणि हिंदू धर्मानुसार, रात्री बाहेर कपडे धुवू नयेत आणि जरी ते धुतले तरी रात्री वाळवू नयेत, विशेषतः लहान मुलांचे कपडे. वास्तुशास्त्रानुसार, रात्रीच्या वेळी बाहेरील वातावरणात नकारात्मक ऊर्जा संचारते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करू शकते. हे मुलाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तसेच धार्मिक श्रद्धानुसार उन्हात वाळलेले कपडे शुद्ध आणि स्वच्छ असतात आणि रात्री वाळलेले कपडे शुद्ध मानले जात नाहीत. रात्री लहान मुलांचे कपडे वाळवण्याशी संबंधित अनेक परंपरा आणि श्रद्धा आहे. या श्रद्धांचा आधार वैज्ञानिक, वास्तु आणि धार्मिक कारणांशी संबंधित आहे.  

वयस्कर लोक म्हणतात की, कपडे उन्हात वाळवले नसले तरी ते संध्याकाळी परत आणावेत. जे कुठेतरी आपल्या धार्मिक श्रद्धेशी जोडलेले आहे. त्यांचा असाही विश्वास आहे की रात्री लहान मुलांचे कपडे बाहेर ठेवल्याने दुष्ट वाईट शक्ती त्यांचा वापर करू शकतात. जे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, तसेच त्यांचा असा विश्वास आहे की स्वच्छ आणि शुद्ध कपडे उन्हात वाळवल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो. पण जेव्हा कपडे रात्री वळवण्यासाठी बाहेर ठेवले जातात तेव्हा त्यांच्या शुद्धतेवर परिणाम होऊ शकतो.
विज्ञानानुसार, रात्री बाहेर वाळलेले कपडे ओले होतात, ज्यामुळे ते व्यवस्थित वाळत नाहीत. बऱ्याच वेळा, यामुळे, बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी कपड्यांमध्ये प्रवेश करू शकतात. हे आपल्या मुलांच्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत. तसेच, रात्रीच्या वेळी, कीटक, डास किंवा इतर हानिकारक कीटक कपड्यांमध्ये येतात, ज्यामुळे कपड्यांवर अंडी किंवा घाण राहू शकते. ज्यामुळे मुलांना ऍलर्जी किंवा त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
काय करणे योग्य आहे?
मुलांचे कपडे नेहमी उन्हात वाळवा जेणेकरून ते पूर्णपणे वळतील आणि जंतू नष्ट होतील. जर दिवसा कपडे वाळवणे शक्य नसेल, तर बाल्कनीत कपडे वाळवा. तसेच ते झाकून ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे बाह्य उर्जेचा प्रभाव कमी असेल.