श्रीकृष्णावर महामुनी उत्तंक यांना राग आला, मग पुढे काय झाले जाणून घ्या

lord krishna
Last Modified मंगळवार, 2 जून 2020 (19:09 IST)
तहान जी शमली नाही

श्रीकृष्ण स्वतः महाभारत होण्यापासून वाचवू शकले नाही या गोष्टीचा महामुनी उत्तंक यांना फार राग आला होता. त्याच दिवशी भगवान श्रीकृष्ण द्वारिकेेेेला परत जाताना मुनींच्या आश्रमात पोहोचले. त्यांना बघूनच मुनी त्यांना अपशब्द बोलतात - आपण एवढे ज्ञानी आणि सामर्थ्यवान असून देखील युद्ध थांबवू शकला नाही. आपल्याला मी जर श्राप दिलास ते योग्य ठरणार नाही का?

कृष्ण हसले आणि म्हणाले की महामुनी एखाद्याला ज्ञान दिले गेले, समजावून सांगितल्यावर योग्य मार्ग दाखवल्यावर देखील वाईट मार्गाची निवड केल्यावर त्यात ज्ञान देणाऱ्याचे काय दोष?

मीच सर्व केले असते तर या जगात इतक्या लोकांची काय गरज होती?

तरी ही मुनी शांत झाले नाही असे वाटत होते की ते मान्य करणार नाही आणि श्राप देणारच.


तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन त्यांना करविले आणि म्हणाले की महामुनी मी आजतायगत कोणाचे अहित केले नाही निर्दोष माणूस खडका सारखं बळकट असतो. आपण मला श्राप द्या आणि प्रत्यक्ष बघा की माझे या श्रापामुळं काहीही अपाय होणार नाही. आपल्याला काही वर मागायचे असतील तर मागून घ्या.

उत्तंक म्हणाले की मग आपण असे करा की वाळवंटात देखील सर्वत्र पाणी भरून हिरवळ होवो. कृष्ण तथास्तु म्हणून निघून जातात.

महामुनी उत्तंक एके दिवशी सकाळी फिरता फिरता फार लांब निघून जातात. दिवस सरता सरता ते वाळवंटात वाट विसरतात. धुळीचे गुबार थांबल्यावर ते स्वतःला वाळवंटात बघतात. वातावरण तापलं होतं. त्यांचा तहानलेला जीव कासावीस होऊ लागतो.
तेवढ्यात ते बघतात की एक चांडाळ त्यांच्यासमोर उभा असून पाणी घेऊन त्यांना पिण्यास विचारत होता.


उत्तंक चिडून त्याला म्हणतात की हे शूद्र! तू माझ्या समोरून चालता हो नाही तर मी तुला श्राप देऊन तुझा नायनाट करीन. चांडाळ असून देखील तू मला पाणी पाजायला आलास.

ह्याच बरोबर त्यांना कृष्णांवर देखील राग येतो. त्या दिवशी कृष्ण मला फसवून गेले पण आज उत्तंकच्या रागापासून वाचणं अशक्य आहे. श्राप देण्यासाठी तोंड उघडताच त्यांना समोर कृष्ण दिसतात.

कृष्ण त्यांना म्हणतात की आपण चिडू नका. आपणच तर म्हणता की आत्माच आत्मा आहे. आत्माच इंद्र आहे आणि आत्माच परमात्मा आहे. मग आपण सांगा की या चांडाळाच्या आत्म्यात इंद्र नव्हते का! जे आपणास अमृत पाजण्यास आले होते. पण आपण त्याला हुडकवून लावले. आपणच सांगा की मी आपली कशा प्रकारे मदत करू?
असे म्हणून कृष्ण आणि चांडाळ दोघे ही अदृश्य होतात.

महामुनींना फार वाईट वाटतं. त्यांना समजतं की जाती, कुळ आणि गुणांच्या अभिमानात उत्तंग बुडालेल्या माझ्या सारख्या माणसाला शास्त्राचे व्यावहारिक ज्ञान कळलं नाही तर मग कौरव -पांडवांनी श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकले नाही ह्यात कृष्णाचा काय दोष?


थोरवंत फक्त मार्ग दाखवू शकतात. कोणी त्या ज्ञानाला आपल्या जीवनात आत्मसातच केले नाही आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या लाभापासून वंचित असेल तर त्यात त्यांचा काय दोष?


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्रावणातील 5 सोमवार हे शिवाच्या 5 चेहऱ्याचे प्रतीक आहे, ...

श्रावणातील 5 सोमवार हे शिवाच्या 5 चेहऱ्याचे प्रतीक आहे, जाणून घ्या हे 5 गुपित....
श्रावण महिन्यातील पाच सोमवार हे शिवाच्या 5चेहऱ्याचे प्रतीक मानले गेले आहेत. चला जाणून घेऊ ...

बाल संस्कार : आपल्या मुलांना नक्की शिकवा हे 17 दिव्य ...

बाल संस्कार : आपल्या मुलांना नक्की शिकवा हे 17 दिव्य श्लोक....
आपल्या पुराणात असलेले आणि नमूद केलेले मंत्र श्लोक आपल्या मुलांना नक्की शिकवा, जीवनातील ...

पिप्पलाद अवतार : यामुळे 16 वर्षाच्या वयापर्यंत शनी त्रास ...

पिप्पलाद अवतार : यामुळे 16 वर्षाच्या वयापर्यंत शनी त्रास देत नसतात
शिव महापुराणात भगवान शिवाचे अनेक अवताराचे वर्णन केले आहे. कुठे कुठे तर त्यांचे 24 तर कुठे ...

Food For Fasting : स्वादासह आरोग्यासाठी उपवासात खावे हे 10 ...

Food For Fasting : स्वादासह आरोग्यासाठी उपवासात खावे हे 10 पदार्थ
उपवासाच्या वेळी, आपल्याला हे समजत नसल्यास की काय खावं जे उपवासात देखील कामी येईल आणि ...

तुळस घरात असणे आवश्यक का? नक्की वाचा

तुळस घरात असणे आवश्यक का? नक्की वाचा
हिंदू मान्यतांनुसार प्रत्येक घराच्या बाहेर तुळस असणं आवश्यक मानले गेले आहे. एवढेच नव्हे ...

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील ज्युनियर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण कुटुंबाची शुद्ध हरपली
उत्तर प्रदेश येथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांज्याची भाजी शिजवून खाल्ल्याचा विचित्र ...

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ...

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स फीचर युजर्ससाठी रोलआउट

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स  फीचर  युजर्ससाठी रोलआउट
फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स या हे फीचर कंपनीने युजर्ससाठी ...

फेसबुकचे नवे मजेशीर फीचर 'Avatars’

फेसबुकचे नवे  मजेशीर फीचर  'Avatars’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने युजर्ससाठी एक मजेशीर फीचर आणलं आहे. याद्वारे युजर्स ...