श्रीस्वामीसमर्थ प्रकट दिन : श्रीस्वामीसमर्थांचे पद

swami samarth
Last Modified बुधवार, 14 एप्रिल 2021 (21:33 IST)
कर्दळीवनी गुप्त होती।
द्वितीयावतारी श्रीनृसिंह सरस्वती।
पंचशताब्दी नंतर प्रकटले।
नरसिंह भान स्वामी समर्थ तेथे।।१।।

अजाणूबाहू दिव्य तेजकांती।
जणू रवि शशीस ही पडे भ्रांती।
तेथूनी प्राकट्य त्यांचे होई।
अक्कलकोटी ग्रामी अवतीर्ण होई।।२।।

चोळाप्पा भक्त अति भाग्यवान।
धन्य त्याचे ते निवासस्थान।
परीसस्पर्श लाभला स्वामींचा।
भाग्यास ही हेवा वाटे या भाग्याचा।।३।।

विरभद्र रुपात दर्शन स्वामी देती।
त्रिशूळ, कोयता, ही आयुधे करी असती।
साडेसात फूट उंची ज्यांची।
काय वर्णू मी थोरवी स्वामींची।।४।।

अंगरखा आणि रुद्राक्षमाळ।
सोबत पादुका त्या निर्मळ।
अजून शक्तीस्रोत आहे तेथे।
धन्य ती वास्तू, जेथे वास्तव्य होते।।५।।

याच वास्तूत विहीर कोरडी ती।
स्वामी तिच्यात लघुशंका करिती।
गोड झरा अमृताचा फुटून वाही।
अद्यापि आहे देण्यास प्रचीती।।६।।

वटवृक्ष मंदिरी स्वामींचे नित्य स्थान।
" हम गया नही, जिंदा है।" हे भक्तांसी अभिवचन।
" भिऊ नको, मी पाठीशी आहे," केवढा हा आधार।
या स्थितीत स्वामीच तारणार।।७।।

कृष्ण पक्षातील त्रयोदशी/चतुर्दशी तिथी।
मास चैत्र होता, चवथ्या प्रहरी।
स्वामी बैसले निजानंदास तेथे।
चोळाप्पा वास्तू पुनः पुनः धन्य होते।।८।।
जय स्वामी समर्थ किती आळवावे।
या कठीण काळी तूच बा पाहावे।
नको अंत पाहू, देई शक्तीस अर्थ।
सतत आळवू आम्ही जय स्वामी समर्थ।।९।।


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

वरुथिनी एकादशी व्रत कथा (Varuthini Ekadashi Katha)

वरुथिनी एकादशी व्रत कथा (Varuthini Ekadashi Katha)
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या विनंतीवर या एकादशी व्रताची कथा आणि महत्त्व सांगितले. ...

गरुड पुराणातील ही 7 संकेतांमुळे ज्ञात होते की व्यक्ती खोटे ...

गरुड पुराणातील ही 7 संकेतांमुळे ज्ञात होते की व्यक्ती खोटे बोलत आहे की नाही?
हिंदू धर्मात गरूड पुराणाला विशेष महत्त्व आहे. गरूड पुराणात भगवान विष्णू आणि गरूड ...

प. पू. नाना महाराज तराणेकर यांची अलौकिक दत्त भक्ती

प. पू. नाना महाराज तराणेकर यांची अलौकिक दत्त भक्ती
परम पूज्य नाना महाराज यांच्या घराण्यात दत्तभक्तीची उत्कटधारा पिढ्यानपिढ्यापासून होती. बाल ...

त्रिपदीचे अध्वर्यु- नानामहाराज तराणेकर

त्रिपदीचे अध्वर्यु- नानामहाराज तराणेकर
हिंदू संस्कृतीला दत्तसंप्रदायाची मोठी परंपरा आहे. दत्तसंप्रदायाला सुमारे अठराशे वर्षांचा ...

देवपूजा - एक मेडिटेशन

देवपूजा - एक मेडिटेशन
पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली. मग ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...