सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 (09:55 IST)

Siddhavat Plant पार्वतीने लावलेले झाड येथे आजही सुरक्षित आहे

siddhavat plant
Siddhavat Planted by Mata Parvati तसे तर, देवी पार्वतीने वेगवेगळ्या ठिकाणी बरीच झाडे लावली, त्यातील काही झाडे आजतायगत सुरक्षित आहेत. त्यापैकी एका झाडाची माहिती आज आम्ही आपल्याला येथे देत आहोत. 
 
असे म्हणतात की माता पार्वतीने उज्जैनच्या क्षिप्रा नदीच्या काठावर एक वडाचे झाड लावले होते त्याला सिद्धवट म्हटले जाते. स्कन्द पुराणानुसार, पार्वती मातेने लावलेल्या या वटवृक्षाची शिवाच्या रूपात पूजा केली जाते. उज्जैनच्या भैरवगढच्या पूर्वेस क्षिप्राच्या काठी प्राचीन सिद्धवट नावाची जागा आहे. याला शक्तिभेद तीर्थ नावाने ओळखले जाते. 
 
हिंदूंच्या मते, हे चार प्राचीन वटवृक्षांपैकी एक आहे. या जगात फक्त चारच पवित्र वटवृक्ष आहे. प्रयाग येथील अक्षयवट, मथुरा वृंदावनात वंशीवट, गयातील गयावट, ज्याला बौद्धवट देखील म्हणतात आणि उज्जैन मध्ये पवित्र सिद्धवट आहेत. नाशिकच्या पंचवटी परिसरातील सीता मातेच्या गुहेच्या जवळ पाच प्राचीन झाडे आहेत ज्यांना पंचवट असे म्हणतात. वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम, देवी सीता आणि लक्ष्मण यांनी येथे काही काळ घालवला होता. 
 
मोगल काळात या सर्व झाडांचा नायनाट करण्याचे अनेक प्रयत्न झाले. असे म्हणतात की पार्वतीचा मुलगा कार्तिक स्वामींना सिद्धवटच्या जागीच सेनापती म्हणून नियुक्त केले होते. इथेच त्यांनी तारकासुराचा वध केला होता. 
 
इथे तीन प्रकारच्या सिद्धी मिळते संतती, संपत्ती आणि सद्गती. या तिन्हीच्या प्राप्तीसाठी येथे पूजा केली जाते. सद्गती म्हणजे आपल्या पितरांसाठी विधी केली जाते. संपत्ती म्हणजे लक्ष्मी कार्यासाठी झाडावर रक्षासूत्र बांधतात आणि संतती म्हणजे अपत्य प्राप्तीसाठी उलटे स्वस्तिक बनवतात. हे झाड तिन्ही प्रकारची सिद्धी देतात म्हणून याला सिद्धवट म्हणतात.
 
इथे नारायण, नागबळी, यज्ञ विधीला विशेष महत्त्व आहे. संपत्ती, संतती आणि सद्गतीच्या सिद्धिचे कार्य इथे होतात. इथे कालसर्प शांतीचे विशेष महत्त्व आहे, म्हणून इथे कालसर्प दोषाची पूजा केली जाते. सध्या हे सिद्धवट संस्कार, मोक्ष, पिंडदान, कालसर्पदोष पूजा आणि अंत्यसंस्कारासाठी मुख्य स्थान मानले गेले आहेत.