बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

सोमालिया सरकारने टोळधाडींमुळे देशात आणीबाणीची केली घोषणा

आफ्रिका खंडातील सोमालिया सरकारने टोळधाडींमुळे देशात आणीबाणीची घोषणा केली आहे. यामुळे अन्न धान्याचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे देशातील कृषीमंत्रालयाने आणीबाणीची घोषणा करण्याची मागणी सरकारकडे केल्यानंतर आणीबाणी घोषित केली आहे.
 
सोमालियाच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “टोळांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. टोळधाडीचे प्रमाण वाढल्यामुळे देशातील अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकांना अन्नधान्य पुरवणारी पिके या टोळधाडींमुळे नष्ट होत आहेत. देशभरामध्ये अनेक ठिकाणी एकाचवेळी टोळांची संख्या हजारोंनी वाढली असून हे टोळ सामान्यपेक्षा मोठ्या आकाराचे आहेत. हे टोळ मोठ्याप्रमाणात पिके खात असल्याने देशाचा अन्नसुरक्षा कार्यक्रम धोक्यात आला आहे.”
 
देशातील टोळांचा बंदोबस्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मदत मिळावी आणि हा प्रश्न किती गंभीर आहे हे जगभरात कळावे यासाठी आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कृषी मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.