शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मे 2019 (09:46 IST)

पुन्हा एकदा अनुपम खेर यांचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता आणि भाजपचे खासदार किरण खेर यांचे पती अनुपम खेर यांच्या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रचारादरम्यान एका दुकानदाराकडे जेव्हा अनुपम खेर जातात तेव्हा तो दुकानदार त्यांना भाजपचा २०१४ चा जाहीरनामा दाखवतो. याशिवाय तो खेर यांना गेल्या निवडणुकीत दिलेल्या वचनांचे काय? असा जाब विचारतो. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा नामुष्कीची वेळ आली. ते काहीच उत्तर न देता परत निघून जातात. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनुपम खेर यांच्या पत्नी हरियाणा जिल्ह्याच्या चंडीगड मतदारसंघातून उभ्या आहेत.